नाशिक : शहरात भररस्त्यात, चौकात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले असून बहुसंख्य वेळा असे वाढदिवस एखाद्या गल्लीबोळातील भाई, दादाचे असतात. अशा वाढदिवसांचा त्रास परिसरातील नागरिकांनाही होत असल्याने पोलिसांकडून अशा प्रकारांची गांभिर्याने दखल घेण्यात येऊ लागली असून अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६३ कोटींचा प्रस्ताव, अवकाळीची ३५ हजार हेक्टवरील पिकांना झळ

रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू नयेत, असा न्यायालयाचा आदेश असताना नाशिकरोड येथील खर्जुल मळा परिसरात भर रस्त्यात शिवाजी गायधनी, शेखर गायधनी (रा. खर्जुल मळा), आकाश जारस (रा. सुभाष रोड), भारत सालकर (रा. गोसावी वाडी) हे केक कापून आरडाओरड करत वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्या हुल्लडबाजीची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही ताब्यात घेतले. यावेळी संशयितांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्यावर पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप देत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, चारही संशयित रुग्णवाहिकेचे चालक आहेत.