जळगाव : राज्यात महायुतीला ३४ पेक्षा अधिक जागा मिळतील. मात्र, काही ठिकाणी उमेदवार बदलायला हवे होते. ते मात्र झाले नाही, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. भाजपवर टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष कोणता, हे आधी सांगावे, असेही त्यांनी डिवचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पूर्वसंध्येला महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आणि सांगितल्याप्रमाणे चारशेपारचा आकडासुद्धा ओलांडणार, असा दावा महाजन यांनी केला. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळणार असल्याचे दिसत असले तरी महायुती कुठेही कमी राहणार नाही. ४०-४५ नसल्या तरी किमान ३४-३५ जागा महायुतीला मिळतील. उत्तर महाराष्ट्र हा राज्यात क्रमांक एकवर राहील. राज्यात कमी जागा दाखविण्यात येत आहेत, हे खरे आहे. यामागे वाढती महागाई, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न ही महत्वाची कारणे आहेत. राज्यात काही ठिकाणी उमेदवार बदलायला हवे होते. ते मात्र झाले नाही. त्यामुळे महायुतीच्या जागा कमी होत असल्याचे महाजन यांनी मान्य केले.

हेही वाचा : जळगावात पुन्हा एक हत्या; पंधरवड्यातील दुसरी घटना

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो, असे म्हटले होते. याविषयी महाजन यांनी, खडसेंनी आमची चिंता करू करू नये. ते कोणत्या पक्षात आहेत, ते आधी त्यांनी सांगावे, असे डिवचले.