नाशिक : दिवाळी सुट्टीनिमित्त बहुसंख्य जण गावी गेल्याची संधी साधत चोरटे बंद घर हेरून घरफोडी करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीत दोन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथील पुष्पेंद्र त्रिपाठी (२५) यांचे बंद घर चोरांनी फोडून सोने, चांदीचे अलंकार तसेच रोख रक्कम असा एक लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मला…”
दुसऱ्या घटनेत छबु हिरे हे कुटूंबातील अन्य सदस्यांसमवेत दिवाळीनिमित्त गावी गेल्याची संधी साधत चोराने घर फोडत ११ हजार रुपये, सोन्याची नथ असा मुद्देमाल लंपास केला. हिरे गावावरून परत आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.