नाशिक : समाज माध्यमात दिलेल्या माहितीवरुन पिंपळगाव बसवंत येथील दोन मित्रांमधील वादाला वेगळे वळण मिळाले. एका गटाने केलेल्या बेदम मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला. या घटनेच्या निेषेधार्थ रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पिंपळगाव बसवंतमध्ये बंदची हाक देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांनी उपरोक्त प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी

याबाबत पिंपळगावच्या चिंचखेड रस्त्यावरील रवी बिगानिया यांनी तक्रार दिली. त्यांचा मुलगा आर्यन याला समाज माध्यमात माहिती दिल्याचा राग मनात धरून मिझान शहा, आयान शहा आणि त्यांच्या १५ ते २० मित्रांनी कन्याशाळेजवळ दुचाकी रोखून लाकडी दांडके तसेच दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करुन पाच संशयितांना ताब्यात घेतले. आर्यन आणि संशयित मिझान हे दोघे मित्र असल्याचे सांगितले जाते. संबंधित घटनेची माहिती समजल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी रविवारी पिंपळगाव बंदची घोषणा केली. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. आमदार फरांदे यांनी हिंदुत्वावर असे हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला. उपरोक्त प्रकरणात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. बंदमुळे दुपारपर्यंत पिंपळगाव बसवंतमधील सर्व व्यवहार थंडावले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik hindu organization protest march after hindu youth beaten up in pimpalgaon baswant css