नाशिक : शहरातील इंदिरानगर भागात आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असलेल्या पती, पत्नीने मुलीसह आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

इंदिरानगरातील वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफ नगरात विजय सहाणे (४०) हे पत्नी ज्ञानेश्वरी ( ३६) आणि मुलगी अनन्या (नऊ) यांच्या समवेत राहत होते. विजय हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीत कामाला होते. त्यांना काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. याविरोधात विजय हे न्यायालयात गेल्यावर त्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे सहाणे पुन्हा कामावर जात होते.

हे ही वाचा…धुळे जिल्ह्यात विसर्जनावेळी नदीत बुडून दोन भावांचा मृत्यू

सहाणे यांची आर्थिक स्थिती व्यवस्थित असून त्यांचा बंगला आहे. मंगळवारी गणेश विसर्जनानंतर विजय हे कुटूंबासमवेत बाहेर जेवण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी शेजाऱ्यांनी आवाज दिल्यावर बंगल्यातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलीस आल्यावर सहाणे दाम्पत्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. अनन्याही मृतावस्थेत होती. या घटनेने शेजारी हादरुन गेले.

हे ही वाचा…नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहाणे कुटूंबाची आर्थिक स्थिती चांगली होती. विजय सहाणे यांना पगारही मिळत होता. त्यांनी आत्महत्या का केली, याविषयी अस्पष्टता आहे. त्यासंदर्भात तपास सुरु आहे.- अशोक शेरमाळे (निरीक्षक, इंदिरा नगर पोलीस ठाणे)