नाशिक : भाजपप्रमाणेच सर्व समाज घटकांना पक्षात स्थान देण्याची तयारी काँग्रेसकडूनही सुरू झाली आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात लवकरच भटक्या विमुक्त विभागाची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रदेश काँग्रेस भटक्या विमुक्त विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. पल्लवी रेणके यांनी सांगितले. शहर काँग्रेस भवन येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी काळात भटक्या व विमुक्त विभागातर्फे राज्यात मजबूत संघटनेची बांधणी केली जाणार आहे. काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी विभागातर्फे प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यावर जातनिहाय जनगणना काँग्रेस सरकार करेल अशी आशा ॲड. रेणके यांनी व्यक्त केली. लवकरच उत्तर महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांचा मेळावा नाशिक शहरात आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : कामात अडथळे, मराठा आरक्षणास विरोधावरून छगन भुजबळ यांना धक्का; मनमाड बाजार समिती सभापती संजय पवार यांचा राजीनामा

भटक्या विमुक्त विभागाची जिल्हा व शहर कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल. जे पदाधिकारी सक्रियपणे काम करतील त्यांना कार्यकारिणीत संधी दिली जाईल, असे रेणके यांनी नमूद केले. काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी उत्तर महाराष्ट्राच्या नियोजित मेळाव्यासाठी शहर काँग्रेसतर्फे सर्व सहकार्य केले जाईल आणि भटक्या विमुक्त विभागातील कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी देण्यात येईल, असे सांगितले. बैठकीस प्रदेश सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बादल गायकवाड, ज्येष्ठ नेते उमाकांत गवळी, ज्येष्ठ नेते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik leaders from nomadic tribes to be included in the congress nashik city and district executive committee adv pallavi renke informed css