नाशिक: शहरापासून दूर असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात सोमवारी सकाळी बिबट्यास भुलीचे इंजेक्शन देवून वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास विद्यापीठातील कर्मचारी आवारात काम करत असतांना अतिथी गृहाजवळ बिबट्या दिसून आला. कर्मचाऱ्यांनी त्वरीत वन विभागाला माहिती दिली. एका कर्मचाऱ्याने बिबट्याला हुसकाविण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या कर्मचाऱ्यावर धावून गेला. बिबट्याची नखे कर्मचाऱ्याला लागली आहेत. नंतर बिबट्या अतिथी गृहात शिरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नाशिक: वणीजवळील अपघातात मजुराचा मृत्यू, ३२ जण जखमी; भ्रमणध्वनीच्या उजेडात जखमींवर उपचार

अतिथी गृहातील एका खोलीत ठाण मांडून बसला. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी बिबट्या असलेल्या खोलीचे दार लावून घेतले. खिडकीतून बिबट्याला इंजेक्शन देत बेशुध्द करण्यात आले. बिबट्या बेशुध्द झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. बिबट्या नर असून तीन ते चार वर्षाचा असल्याची माहिती वन अधिकारी वृषाली गाडे यांनी दिली.