नाशिक : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टिकेच्या निषेधार्थ येवला तालुक्यातील साबरवाडी ( देवरगाव ) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भुजबळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध करण्यात आला.
हेही वाचा : नाशिक : राज्यपाल येती घरा… कुशेगाव, मोडाळे या गावांचा चेहरामोहरा बदलण्याची धडपड
भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करु नये, अशी अपेक्षा सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. साबरवाडीत भुजबळ यांचा निषेध करताना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाचे किरण ठाकरे, विठ्ठल सालमुठे,साहेबराव दाभाडे आदी उपस्थित होते.