नाशिक : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्यावर सातत्याने टीका करणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. सोमवारी आपल्या येवला मतदार संघात जाताना भुजबळ यांना भरवस फाटा येथे मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखविण्यात आले. काही दिवसांपासून मंत्री भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून घेतलेल्या भूमिकेवरून लक्ष्य केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : वाहन अडवून लूटमार करणाऱ्या सहा जणांना अटक, तक्रारदारच संशयित

मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेले मनोज जरांगे आणि ओबीसी आरक्षणाच्या हितासाठी आग्रही भुजबळ यांच्यात वाकयुध्द सुरू आहे. दोघेही एकमेकांचा एकेरी उल्लेख करुन टीका करतात. सोमवारी भुजबळ हे येवला या आपल्या मतदार संघात जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी भरवस फाटा येथे भुजबळांना काळे झेंडे दाखवले. याआधीही भुजबळ येवला तालुक्यात पीक नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले असताना त्यावेळीही मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्ता अडविण्याचा प्रयत्न करुन भुजबळ परत जा, अशा घोषणा दिल्या होत्या. मराठा आंदोलकांचा रोष अजूनही कमी झाला नसल्याचे सोमवारी पुन्हा एकदा दिसून आले.