नाशिक : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे एकाच भाषणात दुहेरी बोलतात. त्यांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड आहे. बीडमधील हॉटेलची जाळपोळ, शिक्षण संस्थांचे नुकसान भुजबळांच्या माणसांनी केल्याचे त्यांनी म्हटले. तत्पुर्वी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर तोच आरोप केला होता. काही वेळाने भाषणात जरांगे हे मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर बीडला काय होते ते लक्षात ठेवा, असा इशारा देतात. याचाच अर्थ बीडला जे घडले, ते जरांगे यांनी केल्याचे सिध्द होते. त्याची अप्रत्यक्ष कबुली भाषणातून त्यांनी दिल्याचा दावा करुन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टिकास्त्र सोडले. एकाच भाषणात उलटसुलट भाष्य येऊ नये म्हणून जरांगे यांनी अनुलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, असा सल्ला भुजबळांनी दिला.

हेही वाचा : “कर्जातून देशाचा विकास”, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा दावा

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला

जरांगे यांनी सभेतून केलेल्या आरोपांना भुजबळांनी येथे प्रत्युत्तर दिले. इशारा सभेतील त्यांचे अर्धे भाषण भुजबळांवर होते. आपल्याविषयी ते बोलले नाहीत तर, ते भाषण तरी काय करणार, हा स्वाभाविक मुद्दा आहे. त्यांच्या कोल्हेकुईला आपण दाद देत नाहीत. त्यांच्या जन्माच्या आधीपासून आपण लढत आहोत. जरांगे हे एकतर बाहेर मोठ्या गर्जना करतात नाहीतर, रुग्णालयात असतात. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. लोकशाही मार्गाने लढा द्यावा, असे भुजबळ यांनी सूचित केले.

हेही वाचा : शहरात तीन ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना, वाहतूक पोलिसांचा पुढाकार

जातगणना करण्याची मागणी आपण अनेक दशकांपासून करीत आहोत. जात गणनेतून प्रत्येक समाजाची लोकसंख्या कळेल. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देता येईल. ओबीसी हा ३७४ लहान जातींचा एक वर्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेतली असून हा मराठा समाजाला मोठा दिलासा आहे. २३ जानेवारीपासून त्याची सुनावणी होईल. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यास आमचा कधीही विरोध नव्हता. विधानसभेत आपण त्याला पाठिंबा दिला होता, असा दाखला त्यांनी दिला.

Story img Loader