नाशिक : शहर पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३०० पेक्षा अधिक वाहनचालकांवर गुन्हा दाखल करुन एक लाख, ९५ हजार २५० रुपये दंड वसूल केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणेनिहाय पोलीस अधिकारी, अंमलदार नाकाबंदीसाठी तसेच गस्तीसाठी तैनात होते. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे, मद्यपान करुन शांतताभंग करणारे तसेच मद्यपान करून वाहन चालविणारे, अशांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा

आडगांव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या परिमंडळ एकमधील पोलीस ठाण्यांतंर्गत १५१ टवाळ खोर आणि ६३ नोंदीतील गुन्हेगार तसेच अंबड, सातपूर , इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, चुंचाळे औद्योगिक वसाहत परिसर या पोलीस ठाण्यातंर्गत १६३ टवाळखोर आणि ६८ नोंदीतील गुन्हेगार अशा ४४५ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली. याशिवाय, मोटार वाहन कायद्यातंर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३६ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख, ९५ हजार २५० रुपये दंड आकारण्यात आला. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २२ चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत पाच वाहने गस्तीसाठी ठेवण्यात आली होती.

हेही वाचा : मनमाड : नववर्षातही रेल्वे गाड्यांना विलंब

बंदोबस्तात अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी

नववर्ष पूर्वसंध्येला कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांच्यासह सहा सहायक आयुक्त, ५९ निरीक्षक, ९२ सहायक निरीक्षक, ८८४ अंमलदार, ५०० गृहरक्षक बंदोबस्तात सहभागी होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik more than 300 bikers and drivers fined for violation of traffic rules on 31 december night css
Show comments