नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे चारपासून शनिवारी रात्री नऊपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपातून व त्यांच्या दोन्ही बाजूंमध्ये करण्यात आली आहे. तातडीने दर्शन घेण्यासाठी देणगी दर्शन सुरू राहणार आहे.

हेही वाचा…युवा संमेलनात अमित शहा यांचा ‘राजकीय सूर’

महाशिवरात्री उत्सवानिमित्त देवस्थानच्या वतीने दोन दिवसांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सात मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन यांचे गायन, नऊ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता ओम नटराज अकॅडमीतर्फे कथकचा कार्यक्रम होईल. देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार शुक्रवारी दुपारी तीन वाजता श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पारंपरिक मार्गानुसार कुशावर्तावर पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी पाचपर्यंत पालखी देवस्थानच्या पटांगणात येईल. यावेळी लघुरूद्राभिषेक करण्यात येईल. विशेष महापूजा आणि पालखी सोहळा रात्री ११ ते अडीच या वेळेत होणार आहे. भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभागी होत देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik on the occasion of mahashivratri at trimbakeshwar temple will open for 24 hours psg
Show comments