नाशिक : सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसात काही घरांची पडझड झाली असून शनिवारी सकाळी नार नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. घाटमाथ्यावरील भागात पाच ते सहा दिवसांपासून संततधार सुरू होती. त्यामुळे हंगामात प्रथमच नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. दारणा, भावली, कडवा व नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग केला गेला होता. पाऊस कमी झाल्यानंतर या धरणांतील विसर्ग बराच कमी करण्यात आला. शनिवारी दारणातून २६२४, भावली ४८१, कडवा ६०० आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ६३१० क्युसेक विसर्ग सुरू होता. सुरगाणा तालुक्यातील खोबळा येथे पार नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. याच तालुक्यातील साबरदरा येथे गोपाळ गुबाडे, उंबरपाडा येथील गुबाडे यांच्या घरांचे पावसाने अंशत: नुकसान झाले. आदल्या दिवशीही सुरगाण्यातील कुकडणे व त्र्यंबकेश्वरमधील देवडोंगरी येथे वादळी पावसाने काही घरांचे नुकसान झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा