नाशिक : प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने देवळा तालुक्यातील उमराणे येथून शेतकऱ्यांनी कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर मोर्चा काढला. नाफेड कार्यालयासमोर टँकर उभे करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते. परंतु, कुणी दखल न घेतल्याने आंदोलकांनी नाफेड कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन माघारी फिरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मनमाड : नववर्षातही रेल्वे गाड्यांना विलंब

कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी, नाफेडने बाजार समितीतच खरेदी करावी, कांदाला सरासरी चार हजार रुपये भाव द्यावा, नाफेडने पारदर्शी खरेदी करावी, एक महिन्यात कांदा दरात होणारी घट, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यांसाठी शेतकरी नाफेड कार्यालयावर धडकले. सकाळी ११ वाजता उमराणे येथील उत्पादक शेतकरी प्रहार संघटनेचे फलक ट्रॅक्टरला लाऊन पिंपळगाव बसवंत येथील महामार्गावरील नाफेड कार्यालयावर आले. या ठिकाणी ठिय्या देऊन त्यांनी आंदोलन सुरू केले. केंद्र सरकारच्या कांदा धोरणाचा निषेध केला. महिनाभरात कांदा दरात मोठी घसरण झाली. नाफेडची खरेदी फसवी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

हेही वाचा : नाशिक : इंदिरानगरात गॅस गळतीमुळे आगीत दोन जण जखमी

व्यापारी व नाफेड खरेदीतील तफावत मांडली. संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही. अखेर नाफेड कार्यालयाला काहींनी कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे बापू देवरे, कुष्णा जाधव, हरिसिंग ठोके, स्वप्निल आहेर, स्वप्निल सूर्यवंशी, हेमंत निकम आदी पदाधिकारी ५० शेतकऱ्यांसह आपले कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन निघून गेले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik onion producer farmers tractor march on nafed office css
Show comments