नाशिक : सिडकोतील पवननगर भागात स्मार्ट सिटीच्या कामातंर्गत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची गॅस जोडणी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी खोदकाम करण्यात येत होते. यावेळी जेसीबीचा धक्का लागल्याने गॅस गळती सुरू झाली. परिसरात गॅसचा वास पसरल्याने हा प्रकार लक्षात आला. प्रशासनाच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पवननगर येथील शिंदे मेसमागील बाजूला असलेल्या गणेश अंडी दुकानासमोरील मुख्य रस्त्या लगत स्मार्ट सिटी कामातंर्गत गॅस जोडणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅसची वाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का गॅस वाहिनीला लागला. त्यामुळे गॅस गळती सुरु झाली. कंपनी कर्मचाऱ्यांकडून त्यावेळी व्हॉल्व्ह बदलण्याचे काम सुरू होते. गॅस गळतीमुळे परिसरात गॅसचा वास पसरला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती. स्मार्ट सिटी कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून गळती थांबविण्यात आली. स्मार्ट सिटी प्रशासन आणि एमएनजीएल यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. काही वेळानंतर वाहतूक नियमित सुरू झाली.