नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे भंगार दुकानाच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी आग लागल्याने १५ ते २० दुकाने भस्मसात झाले. आग विझवण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागला.

पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर भंगाराची दुकाने आणि गोदामे आहेत. शुक्रवारी एका दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यातच शॉर्टसर्किटही झाले. त्यामुळे भंगार गोदामातील कागद, प्लास्टिक, लाकुड, रबर यासह वेगवेगळ्या सामानाने पेट घेतला. दुकानाच्या रांगेत कांद्याचे गोदाम असल्याने त्यानेनेही पेट घेतला. आग इतर दुकानांपर्यंतही पोहचली. आगीची तीव्रता पाहता पिंपळगाव बसवंत, ओझर, दिंडोरी, निफाड या ठिकाणाहून अग्निशमन बंब दाखल झाले. तीन तासांहून अधिक वेळ अग्नीतांडव सुरू होते.