नाशिक : विधानसभा निवडणुकीस अवघे चार दिवस उरल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून संचलन करण्यात आले. अलीकडेच नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या मतदार संघांमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारींवरुन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीसारखे प्रकार घडले. या पार्श्वभूमीवर नागरिकांना विश्वास देण्यासाठी अंबड पोलिसांनी शनिवारी संचलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभिनेता गोविंदा छातीत दुखू लागल्याने रोड शो अर्धवट सोडून मुंबईत परत

अंबड पोलीस ठाण्यापासून विजयनगर-उत्तमनगर-पवननगर-सावतानगर-पाटीलनगर-त्रिमूर्ती चौक असे संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक असा २०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा संचलनात सहभागी झाला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik police conducted march in cidco area ahead of vidhan sabha election 2024 css