नाशिक: लोकसभा निवडणूक तसेच सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नऊ ते २३ एप्रिल या कालावधीसाठी मनाई आदेश देण्यात आले आहेत. शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी, कामगार व व्यापारी संघटना यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारांनी आंदोलन करण्यात येत आहे.
हेही वाचा : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी टंचाईमुळे स्थिती बिकट
लोकसभा निवडणूक आणि सण, उत्सव पाहता शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजवणे, वाहनांवर धोकादायकरित्या झेंडे लावत शहरात फिरणे, धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन, पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे, यास मनाई करण्यात आली आहे.