नाशिक : दिवाळीत होणाऱ्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी तसेच नोंदीतील गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन अंतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ दोनच्या उपआयुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त, नाशिकरोड विभाग तसेच पोलीस ठाणे प्रभारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात ७२ हजारांहून अधिक कुणबी नोंदींचा शोध, आतापर्यंत तीस लाख नोंदींची पडताळणी
नोंदीतील तसेच तडीपार अशा एकूण १३५ गुन्हेगारांची तपासणी करून ६५ गुन्हेगारांचे चौकशी अर्ज भरुन घेण्यात आले. ५० टवाळखोरांविरूध्द कारवाई करण्यात आली. अंबड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत आठ जणांविरुध्द कारवाई झाली. गुन्हेगारांची तपासणी करणे, नाकाबंदी, घरझडती अशी कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.