नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीच्यावतीने शुक्रवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी केली जात आहे. सभेला एक लाख जणांना जमविण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने नियोजन प्रगतीपथावर आहे. या तयारीचा आढावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांच्या जाहीर सभांना उत्तर महाराष्ट्रातून सुरुवात होत आहे. पंचवटीतील तपोवनातील मैदानावर दुपारी ही सभा होणार आहे. सभा यशस्वी करण्यासाठी भाजपची मंडळी तयारीला लागली आहे. मैदानावर भव्य जलरोधक तंबू आणि व्यासपीठ उभारणी प्रगतीपथावर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयारीचा आढावा घेतला. या सभेला किमान एक लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने संपूर्ण तयारी केली जात असल्याचे भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे जिल्ह्यात मालेगाव मध्य वगळता एकूण १४ उमेदवार आहेत. ते देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सावजी यांनी सांगितले.

pm narendra modi rally
नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव, माजी खासदारास अभय

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक पातळीवर प्रमुख नेत्यांची ही पहिलीच सभा आहे. पंतप्रधानांच्या सभेचा उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल केली. लोकसभा निवडणुकीतील विरोधकांचा प्रचार जनतेच्या लक्षात आला असून त्याचा परिणाम विधानसभेत होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा : नाशिक : परिमंडळ दोन अंतर्गत २० गुन्हेगार तडीपार

तयारीपासून मित्रपक्ष दूर ?

पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या तयारीत भाजप वगळता महायुतीतील अन्य मित्रपक्षांची मंडळी फारशी दिसत नाहीत. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात देवळाली आणि नांदगावच्या जागेवरून मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्ही जागांवर एकमेकांनी बंडखोरीचे निशाण फडकावले असून त्यावरून परस्परांना लक्ष्य केले जात आहे. या सभेपूर्वी उभयतांतील मतभेदावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader