नाशिक : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना मदतीसाठी जिल्ह्यात वेगवेगळी जबाबदारी सांभाळण्यासाठी १६ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधितांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली. या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतील बदल, नव्या ॲपची माहिती अवगत करण्यासह आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीचा अभ्यासासाठी उपयोग करून आपली जबाबदारी चोखपणे बजावण्यास सांगण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विभागीय उपायुक्त रमेश काळे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नवीन मतदार नोंदणीपासून ते दुबार नावे वगळणे, माहिती अद्ययावत करणे ही कामे प्रशासकीय पातळीवर केली जात असल्याचे नमूद केले. संकलित केलेल्या माहितीची शुद्धता ही निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. त्रूटी टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा…नाशिक : ‘आदिवासी विकास’च्या उपायुक्तांचा शाही वाढदिवस चर्चेत, तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

निवडणूक पूर्वतयारीसाठी फेब्रुवारी महिना महत्त्वाचा आहे. सर्वानी अधिसुचना, निवडणूक संदर्भातील मार्गदर्शक सूचना, कायदे व नियम यांचे वाचन करून त्या संदर्भात आवश्यक नोंदी काढल्यास त्याचा उपयोग येणाऱ्या काळात होईल, असे ते म्हणाले. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र, ऑनलाईन अपलोड करतांना सर्व बाबी व आवश्यक पूर्तता अचूक पाहूनच अपलोड करावेत, अशा सूचनाही समन्वय अधिकाऱ्यांनी संबधित यंत्रणेला द्याव्यात, असे त्यांनी सूचित केले.

विषयनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्रीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी १६ प्रकारचे समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. यात मनुष्यबळ, प्रशिक्षण, सामग्री, वाहतूक व्यवस्था, संगणक व सायबर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक खर्च देखरेख आदी विषयनिहाय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा…नाशिक: अमली पदार्थ विक्री प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक

मतदार यादीशी संबंधीत कामांना वेग

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नवीन मतदार नोंदणीपासून ते दुबार नावे वगळणे, माहिती अद्ययावत करणे ही कामे प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. संकलित केलेल्या माहितीची शुद्धता ही निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. त्रूटी टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik preparations for the upcoming lok sabha general election have started 16 coordination officers appointed psg