नाशिक : एकेकाळी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात आढळणारी कंदवर्गीय रानभाजी अर्थात आदिवासी बोलीत कवळीची भाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफेद मुसळीचे जंगलातील प्रमाण वाढत्या मागणीमुळे आता कमी झाले आहे.

जूनमध्ये पहिल्या पावसाला सुरुवात झाली की जंगलात अनेक कंदवर्गीय रानभाज्या उगवतात. यामध्ये शेवळा, दिहगडी, लोत, तेरा, कवळीची भाजी ( सफेद मुसळी) अशा भाज्या मुख्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळतात. सुमारे १५ वर्षांपूर्वी कवळीची भाजी मुबलक प्रमाणात जंगलात आढळत असे. या भाजीमध्ये असलेले औषधी गुणधर्म तसेच उच्च प्रतीचे प्रथिने, शरीरास मिळणारे पोषक घटक जसे लक्षात येऊ लागले, त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागल्याने लोकांनी हव्यासापोटी तसेच अर्थार्जनासाठी जंगलातून कंदासह खणून आणत व्यापाऱ्यांना सफेद मुसळी विकली. परिणामी, आज सफेद मुसळी जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

हेही वाचा : नाशिकमध्ये पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रणासाठी ऑनलाईन परवाना, जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

कोरडवाहू शेतकरी आता आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सफेद मुसळीच्या शेतीकडे वळले आहेत. सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागात जास्त प्रमाणात सफेद मुसळीची लागवड केली जात आहे. म्हैसखडक, दोडीपाडा, उंबरठाण, चुली, शिवपाडा, देवीपाडा, दरापाडा, वडपाडा, फणसपाडा, चुली, बेहुडणे, राशा, बोरचोंड, वांगण, करंजुल, मांधा, रघतविहीर, चिंचमाळ, बर्डा, गाळबारी, पिंपळसोंड, कोठुळा, काठीपाडा सुळे, विजयनगर, पालविहीर या गावातील शेतकरी सफेद मुसळीच्या लागवडीकडे वळले आहेत.

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागात सफेद मुसळीची लागवड केली जात आहे.

कोटींची उलाढाल

सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा, उंबरठाण तसेच गुजरात राज्यातील बिलदा, धरमपूर येथे सफेद मुसळी खरेदी केली जाते. मागणी, पुरवठा, आवक यानुसार भाव दिला जातो. साधारणपणे एक हजार २०० रुपयांपासून ते दोन हजार ४०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो वाळलेल्या कंदाला भाव मिळतो. लागवडीसाठी बियाणे विकत घ्यायचे असेल तर ओले बियाणे प्रतिकिलो ५०० रुपये दराने मिळते. यामध्ये एक काडी आणि काप्या हे वाण पहावयास मिळतात. एक काडी अथवा एक कंद लावला जातो. काप्यामध्ये एकापेक्षा जास्त कंद एका जागेत लावतात.

हेही वाचा : नाशिक : ‘भूमी अभिलेख’चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, ३५ हजारांची लाच घेताना प्रभारी भूकरमापक जाळ्यात

लागवडीचे तंत्र

साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सफेद मुसळीची लागवड केली जाते. यासाठी माळरानावर किंवा भात खाचरात ( आवणात) उताराच्या जागेची निवड करून ती जागा नांगरणी, मशागत करुन भुसभुशीत केली जाते. गादी वाफे करुन ( रताळी, हळद, अळु) लागवडीसारख्या एका सरळ रेषेत लागवड करतात. त्याचवेळी थोड्याफार प्रमाणात खत दिले जाते. नंतर निंदणी केली जाते. कमी पाऊस पडला तर उत्पन्न जास्त मिळते. पावसाचे प्रमाण अधिक असले तर कंद कुजून खराब होतात. त्यामुळे उत्पादनात घट होते. ऑक्टोबर महिन्यात काढणीला सुरुवात केली जाते. वाफ मिळाली तर कंद लवकर सोलले जातात.