नाशिक: साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे उघड झाले. साल्हेर किल्ल्यावर दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले. मृतदेहांवरील कपडे आणि जवळील वस्तूंवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. रामभाऊ वाघ (६०, रा. गोपाळखडी) आणि नरेश पवार (६३, रा. कळवण) अशी त्यांची नावे असल्याचे लक्षात समजले. दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. घटनेबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीणचे नीती गणापुरे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना सूचना दिल्या. वाघ आणि पवार हे १३ नोव्हेंबर रोजी कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटार सायकलीने गेल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा आणि जायखेडा पोलीस पथकाने सतत दोन दिवस साल्हेर किल्ला, केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे शक्य

Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
Shelter 2024 home exhibition, Houses Nashik city,
नाशिक शहरात १५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरे, आजपासून शेल्टर २०२४ गृह प्रदर्शन
Indrayani serial shooting is going on in the cold of Nashik
‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय

विश्वास देशमुख (३६, रा. केळझर), तानाजी पवार (३६, रा. खालप), शरद उर्फ बारकु गांगुर्डे (३०, रा. बागड), सोमनाथ वाघ (५०, रा. गोपाळखडी), गोपीनाथ वाघ (२८, रा. गोपाळखडी), अशोक भोये (३५, रा. सावराडा) ही संशयितांची नावे आहेत. संशयित सोमनाथ वाघ आणि रामभाऊ वाघ यांच्यात जमिनीच्या मालकीवरून वाद होते. या वादात रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश पवार हा कळवण न्यायालयात मदत करत होता. या रागातून संशयित सोमनाथने रामभाऊ आणि नरेश यांना मारण्याचा बेत रचला. दोघांनाही त्याने साल्हेर किल्ल्यावर धनाचा साठा असल्याचे सांगत किल्ल्यावर बोलावून इतरांच्या सहाय्याने दोघांवर काठी, कुऱ्हाडीने वार करुन तसेच दगडाने हत्या केली. मृतदेह निर्जनस्थळी साल्हेर पठारावर सोडून मयतांच्या दुचाकीची विल्हेवाट लावली. परंतु, अखेर संशयित पोलिसांच्या तावडीत सापडले.

Story img Loader