नाशिक: सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसीतील सीमा या उद्योजकांच्या संघटनेतर्फे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार सोहळा विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. राजाभाऊ दिल्लीत आणि आमदार कोकाटे मुंबईत, असे तुम्ही ठरवून घेतले का, असा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी सत्कार सोहळ्यात करताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार माणिक कोकाटे हे राजकीय विरोधक बऱ्याच दिवसांनी प्रथमच एका व्यासपीठावर आले. त्यामुळे दोघे काय बोलतात, याचीही उत्सुकता होती. झाले तसेच. प्रश्नोत्तरे, जुगलबंदी, टाळ्या आणि कोपरखळ्यांनी हा कार्यक्रम चांगलाच रंगला. खासदार वाजे यांनाही हसू आवरले गेले नाही.

nana patole
जागावाटपावर बोलण्याऐवजी विरोधकांवर तोफ डागा – पटोले
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
shrinivas pawar and ajit pawar
Shrinivas Pawar : अजित पवारांचा शरद पवारांवर घर फोडल्याचा आरोप? थोरले भाऊ म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
Dr. Nitin Raut, Dr. Milind Mane
उत्तर नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राऊत- माने लढत
Harshvardhan Patil On Ajit Pawar
Harshvardhan Patil : “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर खोचक टीका
latur district, Congress Deshmukh family, Nilangekar family
काँग्रेसमध्ये देशमुख यांना एक न्याय व निलंगेकरांना दुसरा याबद्दल असंतोष
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
Thrissur Pooram fireworks ie
केरळमध्ये भाजपाचा चंचूप्रवेश होताच स्थानिक उत्सवात हस्तक्षेप? त्रिशूर पूरम वाद काय आहे?

हेही वाचा : सायबर गुन्हेगारीत वाढ, सहा महिन्यात १५ कोटीहून अधिक रक्कम लंपास

सत्काराला उत्तर देताना वाजे यांनी, नाशिक-पुणे रेल्वेसह उद्योगांच्या समस्या सोडविणे आणि उद्योग वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाजे हे येत्या काळात केंद्रात उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. आमदार कोकाटे यांनी नाशिक-पुणे-मुंबई आणि संभाजीनगर या सुवर्ण चतुर्कोनात सिन्नर विकास केंद्र ठरणार असल्याने आपण दोघांनी मिळून राज्यात व केंद्रात उद्योजकांचे प्रश्न मांडून सोडविण्याची गरज असल्याकडे वाजेंचे लक्ष वेधले. या कार्यक्रमास उद्योजकांना सर्व लोकप्रतिनिधी एकत्र हवे होते. मग आजचा योग जुळून आला. तुमचा हेतू साध्य झाला. आता माझा करा, अशी कोपरखळी कोकाटे यांनी मारली. त्यांच्या विधानाचा धागा पकडून आमदार तांबे यांनी ‘राजाभाऊ दिल्लीत गेले, म्हणजे तुमचाही हेतू साध्यच झाला, असे सांगितले. खासदार-आमदारांनी ठरवून घेतले का, या प्रश्नावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी वाजे हसू लपवत असल्याचे पाहून तांबे यांनी त्यावर बोट ठेवले आणि मग राजाभाऊंनाही हसू आवरले नाही.

कार्यक्रमात सीमाचे सचिव बबन वाजे यांनी प्रास्ताविकात माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या समस्या मांडल्या. भूखंडाचे अवाजवी दर, ट्रक टर्मिनसची गरज, आराखडा मान्यतेसाठी होणारी कुचंबना आदी प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला.

हेही वाचा : डेंग्यूवरून नाशिक महापालिकेची राजकीय कोंडी; प्रभावी उपायांचा अभाव, आकडेवारीत लपवाछपवीचा आरोप

सीमा संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक किशोर राठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास श्रीमंत पतसंस्थेचे नारायण वाजे, मऔविमचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सचिव राजेश गडाख आदी उपस्थित होते.

सिन्नरचे राजकारण

नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्यानंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघातून वाजे यांना किती मताधिक्क्य मिळणार, हा चर्चेचा विषय होता. सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कोकाटे यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात फारसा सहभाग घेतला नव्हता. तेव्हाच वाजे दिल्लीत आणि कोकाटे मुंबईत जाण्यासाठी सिन्नरमध्ये राजकारण फिरत असल्याची चर्चा होती.