नाशिक: प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकाच्या वेतनातील आठ वर्षांच्या वेतनातील फरक काढून फाईल मंजुरीसाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिन्नरच्या रामनगर प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक सुनील पाटील आणि शिपाई बाळू निकम यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

तक्रारदार रामनगर प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत आहे. २०१६ ते २०२३ या कालावधीचा वेतन फरक काढून ती फाईल मंजूर करून आणण्यासाठी मुख्याध्यापक पाटीलने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम आश्रमशाळेतील शिपाई बाळू निकम याच्याकडे देण्यास सांगितले. याबाबत तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून मुख्याध्यापकांच्या कार्यालयात संबंधिताने लाच स्वीकारली. पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक पाटील आणि शिपाई निकम यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुध्द सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

हेही वाचा : लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सापळा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. पथकात हवालदार प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे व पोलीस नाईक विलास निकम यांचा समावेश होता. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथवा त्यांच्यावतीने कोणीही कोणतेह शासकीय काम करून देण्यासाठी अथवा न करण्यासाठी किंवा ते करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी ०२५३ – २५७८२३० संपर्क साधावा, असे आवाहन करण्या्त आले आ्हे.