नाशिक : देवळा तहसील कार्यालयात मेंढपाळांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. देवळा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. शासनाने याची दखल घ्यावी, या मागणीसाठी बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : भिशीमध्ये फसवणूक, धुळ्यात सहा जणांविरुध्द गुन्हा

यावेळी मेंढपाळांना चराईसाठी जागा आरक्षित करण्यात यावी, मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात योग्य तो कायदा अमलात आणावा, या मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष बापू देवरे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, जिल्हा चिटणीस समाधान बागूल, भाऊसाहेब मोरे आदींसह तालुक्यातील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik shepherd protest outside devla tehsil office demand to avail fodder for sheeps as no fodder for sheeps due to low rainfall css
Show comments