नाशिक: महामार्गावरील टोलनाका परिसरात मार्गिका बदल करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसची पाठीमागून धडक बसल्याने चालक व वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात झाला. जखमी चाळीसगाव, मालेगाव, नाशिक येथील आहेत

पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगाराची बस जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत शहरातील टोल नाका परिसरात मार्गिका बदलत असताना पुढे असलेल्या रसायनाच्या टँकरला या बसची पाठीमागील बाजूस जोरदार धडक बसली. वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याची प्राथमिक माहिती असून या जोरदार धडकेत बसमधील चालक, वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले. त्यांना पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच पिंपळगाव टोलनाका प्रशासन, महामार्ग पोलिसांसह पिंपळगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य केले.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?

हेही वाचा : लांब चोचीच्या गिधाडाचे ३४ वर्षानंतर जळगाव जिल्ह्यात दर्शन

जखमी प्रवाशांमध्ये गणेश निकम, जयश्री निकम, प्रशांत निकम, लक्ष्मण बाविस्कर, विमल वाणी, दिनेश अहिरे, राजेंद्र पाटील, सुरेखा येवले, हितेश आहेर, (सर्व रा.चाळीसगाव), निकिता विशाल, संतोष कुमार पांडे, वैभव कुमावत, अविनाश राठोड, प्रकाश अमृतकर, मंगला रायते (सर्व रा. नाशिक), गायत्री बैरागी, पूजा पवार, मनीषा पवार, भूमी बैरागी, संध्या बैरागी, कोमल बच्छाव, संगीता बरगडे, गोपाळ खैरनार, योगेश खैरनार, प्रदीप खैरनार, गफ्फार शेख, रजिया शेख (सर्व रा. मालेगाव) आदिंसह चालक, वाचकाचा जखमीत समावेश आहे.

Story img Loader