लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: जिल्ह्यात डोळ्यांची साथ आली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. वेळेत उपचार न झाल्यास डोळ्यांचे आजार गुंतागुंतीचे होतील. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर डोळ्याचे रुग्ण आढळत असून बालकांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन रावते यांनी दिली.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी जोर धरलेला असतांना अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. दुषित पाण्यामुळे काहींना मळमळ, उलटी असा त्रास होत आहे. हा त्रास सुरू असतांना सध्या जिल्ह्यात डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्याला खाज येणे, डोळे सुजणे, अशा वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शालेय वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला डोळे येण्याचा त्रास झाल्यास इतर विद्यार्थ्यांनाही तो होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढले आहे. ज्या विद्यार्थ्यांला त्रास होत असल्याचे लक्षात येते, त्यांच्या पालकांना दूरध्वनीवरून माहिती देत घरी पाठविले जात आहे.

हेही वाचा… जळगाव मनपा आयुक्तांविरोधातील अविश्‍वासावरील विशेष महासभा गणपूर्तीअभावी तहकूब

याविषयी डॉ. रावते यांनी माहिती दिली. डोळ्यांच्या साथीचे प्रमाण वाढले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्याला त्रास होत असेल, अशा रुग्णांनी बाहेर पडू नये. तसेच त्रास झाल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क करावा. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध आहे. बालकांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गुंतागुंत वाढण्याचा धोका

जिल्ह्यात डोळ्याच्या साथीचे रुग्ण वाढले असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. सतत हात स्वच्छ धुवा, त्वचाविकार असलेल्यांच्या संपर्कात आल्यास योग्य खबरदारी घ्यावी. रुग्णांनी वेळेत उपचार न घेतल्यास त्यातील गुंतागुंत वाढू शकते. बुबूळ किंवा डोळ्याच्या अन्य भागाला इजा होऊ शकते. – डॉ. नितीन रावते (आरोग्य अधिकारी, महापालिका)