नाशिक: गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा घाटात रविवारी सायंकाळी पर्यटकांची खासगी बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला. एका मालवाहतूक वाहनापुढे जाण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून बस कठडा तोडून दरीत गेली. या बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुरत येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. सापुतारा हे गुजरात राज्यातील आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेलगतचे पर्यटन स्थळ असल्याने दर शनिवार, रविवारी याठिकाणी मोठी गर्दी असते. सध्या पावसामुळे परिसरातील निसर्ग बहरला आहे. त्यामुळे पर्यटकांची अधिक गर्दी होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरतच्या पर्यटकांना घेऊन आलेली खासगी बस परतीच्या मार्गावर असताना राष्ट्रीय महामार्गावरील सापुताराजवळील घाटात संरक्षक कठडा तोडून खाली कोसळली. चालक एका मालवाहतूक वाहनापुढे जात असताना समोरून आलेल्या टेम्पोपासून वाचण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटले.

हेही वाचा : नाशिक : लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीवरून धुसफूस, कामातून मुक्त करण्याची तहसीलदारांची मागणी

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत

या अपघातात एक आठ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पाच प्रवासी गंभीर आहेत. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच सापुतारा येथील अनेक रूग्णवाहिका व पोलिसांचे पथकही दाखल झाले.

जखमींना गुजरात येथील शमगवान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader