नाशिक: गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा घाटात रविवारी सायंकाळी पर्यटकांची खासगी बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला. एका मालवाहतूक वाहनापुढे जाण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून बस कठडा तोडून दरीत गेली. या बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुरत येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. सापुतारा हे गुजरात राज्यातील आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेलगतचे पर्यटन स्थळ असल्याने दर शनिवार, रविवारी याठिकाणी मोठी गर्दी असते. सध्या पावसामुळे परिसरातील निसर्ग बहरला आहे. त्यामुळे पर्यटकांची अधिक गर्दी होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरतच्या पर्यटकांना घेऊन आलेली खासगी बस परतीच्या मार्गावर असताना राष्ट्रीय महामार्गावरील सापुताराजवळील घाटात संरक्षक कठडा तोडून खाली कोसळली. चालक एका मालवाहतूक वाहनापुढे जात असताना समोरून आलेल्या टेम्पोपासून वाचण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा