नाशिक: देशात सोमवारपासून नवीन कायदे लागू झाल्यानंतर या कायद्यांच्या आधारे पहिल्याच दिवशी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. नवरा दारू पिऊन त्रास देतो शिवीगाळ तसेच मारहाण करतो अशी तक्रार पिडीत विवाहितेने नव्या कायद्याचा आधार घेत पंचवटी पोलीस ठाण्यात केली. तसेच मालमत्तेच्या वादातून भावाने ही तक्रार दाखल केली असून पहिल्याच दिवशी नव्या कायद्याच्या आधारे दोन गुन्हे पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाली असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारवाला नगरात प्रियंका चांडोले (४०) या कुटूंबियांसमवेत राहतात. त्यांचा चहा, नाश्ता विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे पती कुणाल चांडोले यांना दारूचे व्यसन आहे. ते सातत्याने दारूसाठी प्रियंका यांच्याकडे पैसे मागतात. पैसे न दिल्यास घरातील काही सामान विकतो. शिवीगाळ, मारहाण करतो. त्याला विरोध केला तर घरातून निघून जा, असे सांगतो. मारण्याची धमकी देतो, अशी तक्रार प्रियंका यांनी केल्यानंतर नवीन कायद्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : नाशिक: बाइक टॅक्सी, इलेक्ट्रिक रिक्षांना विरोध – रिक्षाचालकांचा मोर्चा

दुसऱ्या घटनेत तानाजी ढुमणे (६५, रा. माणेकशानगर) यांनी भाऊ शिवाजी ढुमणे (७१) विरूध्द तक्रार दिल्यावर नव्या कायद्यातंर्गत पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मालमत्तेवरुन त्यांचे वाद आहेत. कुरापत काढत सातत्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तानाजी यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik two crimes registered at panchvati police station under new law css
Show comments