नाशिक : बागलाण तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील महेंद्र धोंडगे (४३, रा. खामलोन) हे शेतातील विहिरीतून पाण्याची मोटार काढण्यासाठी दोरी टाकून पाईपवरून खाली उतरत असताना मोटारीची दोरी तुटून तोल जावुन ते विहिरीत पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोखंडी साहित्यावर त्यांचे डोके आपटल्याने गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटनाही बागलाण तालुक्यातच घडली. कमलेश ह्याळिज (३३, रा. भाक्षी शिवार) हे विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

हेही वाचा…महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच किचकट

भ्रमणध्वनीवर बोलताना पाय घसरुन मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील रामराव नगरात राहणारे बाबुलाल बहुलिया (४०, मूळ रा. उत्तरप्रदेश) भ्रमणध्वनीवर बोलत इमारतीचा मजला चढत असताना पाय घसरुन पडले. त्यांच्या छातीस, पाठीस, डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना पंडित खेताडे यांनी घोटी येथे दवाखान्यात दाखल केले. दवाखान्यात त्यांचा मृत्यू झाला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik two die in separate incident in well accidents baglan taluka psg