नाशिक : शहरातील इंदिरानगर भागात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सकाळी शुभेच्छांची देवाण घेवाण सुरू असतांना इंदिरानगरमधील कलानगर परिसरातील वक्रतुंड पार्सल पॉइंट येथे गॅस गळतीमुळे आग लागली. पार्सल पॉइंट या ठिकाणी सुरेश लहामगे (६०) आणि संदीप कांडेकर हे सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर आले. दुकान उघडले असता अंधार असल्याने त्यांनी दिवे लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गॅस गळतीमुळे कोंडलेला वायू मोकळा झाला. शाॅर्ट सर्किट होऊन गॅसचा भडका उडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका, कामचुकार सात अंमलदार निलंबित

त्यात भाज्या गरम करण्यासाठी ठेवलेली सामग्री, गॅस शेगडी यासह सर्व सामान जळून खाक झाले. स्फोटात दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले. दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, रहिवाश्यांनी तातडीने सिडको येथील अग्निशमन केंद्रास माहिती दिल्यानंतर बंब घटनास्थळी दाखल झाला. १५ ते २० मिनिटांत ही आग नियंत्रणात आली. जखमी कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती इंदिरा नगर पोलिसांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik two injured in short circuit due to gas leakage at indiranagar area css
Show comments