नाशिक : धुणे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा बुडाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील अशोक जाधव यांची मुलगी पूजा, तिची मैत्रीण खुशी भालेकर आणि कावेरी भालेकर या तिघी धुणे धुण्यासाठी तांड्याजवळ असलेल्या बंधाऱ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. बंधाऱ्यातील पाण्यात पाय घसरून एक मैत्रिण पडल्यावर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही बुडाली.
हेही वाचा : भेसळीच्या संशयातून मसाला, मिरची पावडर साठा जप्त
हा प्रकार अन्य लोकांच्या लक्षात येताच तातडीने दोघींना पाण्यातून बाहेर काढत नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू होण्यापूर्वीच पूजा आणि खुशी (१६) यांचा मृत्यू झाला. कावेरी (१८) हिला मालेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.