नाशिक : शहरातील गंगापूर रस्त्यावरील शारदानगर भागात बंगल्याचे बांधकाम सुरु असताना भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. कोसळलेली भिंत काही दिवसांपूर्वी बांधण्यात आली होती. सावरकर नगरातील शारदानगर येथे ही दुर्घटना घडली. या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा संघटक केदा आहेर यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश

खोदलेल्या भागात उतरून पाच ते सहा मजूर काम करत असताना काही दिवसांपूर्वी बांधलेली भिंत अकस्मात कोसळली. त्याखाली चार मजूर दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच अन्य मजूर आणि आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. जखमी मजुरांना बाहेर काढून तातडीने आनंदवल्लीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच गोकुळ पोटिंदे (२८) आणि प्रभाकर बोरसे (३७, दोघे दरी, नाशिक) या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्घटनेत अनिल जाधव (३०, दरी) आणि संतोष दरोगे (४५, काळेनगर) हे दोघे जखमी झाले आहेत. गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.