नाशिक : शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना सल्ला देणाऱ्या संचालिकेचा दलालीचे पैसे मागण्यास गेल्यानंतर शिवीगाळ करुन विनयभंग करण्यात आला. उपनगर पोलिसांनी चार बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपोवन रस्त्यावरील मेट्रो मॉलसमोर असलेल्या एका गृह प्रकल्पाच्या कार्यालयात ही घटना घडली. पीडिता आपल्या भागीदारासह १६ वर्षांपासून मुंबईसह नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक व विकासकांना सल्ला देण्याचा व्यवसाय करतात. ते आणि संशयित यांच्यात एका गृह प्रकल्पाच्या विक्रीचा करारनामा झाला होता. त्यासाठी पीडितेला दोन टक्के दलाली निश्चित करण्यात आली होती. परंतु, या प्रकरणात आपली फसवणूक होत असल्याचे पाहून पीडितेने व्यावसायिकांकडे दलालीच्या पैशांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पीडिता आणि तिचा सहकारी यांना कार्यालयात बोलावून करारनाम्याची मूळ प्रत हिसकावून घेण्यात आली. शिवीगाळ करत धमकी देण्यात आली. पीडिता कार्यालयाबाहेर आल्यानंतर संशयितांनी लोटून दिले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.