नाशिक : नवीन नाशिक, खुटवडनगर भागात एक-दोन महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी सिटीलिंक बस घेऊन थेट महापालिकेत धडक दिली. प्रवेशद्वारावर हंडे आपटत पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. मनपा आयुक्तांनी आंदोलकांची प्रवेशद्वारावर येऊन भेट न घेतल्यास महापालिकेत शिरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि अनियमित पाणी पुरवठ्याचा विषय ऐरणीवर आला आहे. या मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांनी मागील दोन महिन्यात अनेकदा आंदोलने केली. पाणी पुरवठा विस्कळीत होण्यामागे राजकारण असल्याचे सांगितले जाते. सर्व राजकीय पक्ष, विद्यमान आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन, आंदोलने करूनही अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. महिला वर्गातील असंतोष या आंदोलनातून प्रगट झाला. शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेविका सुुवर्णा मटाले, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, युवा सेना जिल्हाध्यक्ष दीपक दातीर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता सिडको, खुटवडनगर भागातील महिला मनपाच्या सिटीलिंक बस घेऊन महापालिका प्रवेशद्वारावर दाखल झाल्या. सुरक्षारक्षकांना दमदाटी करीत या बस थेट मुख्य प्रवेशद्वारावर नेण्यात आल्या. अकस्मात घडलेल्या या घटनाक्रमाने मनपाच्या सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली.

Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
Even 25 percent of work of Jal Jeevan Mission scheme in district is incomplete says bhaskar jadhav
जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे कोट्यावधी रुपये पाण्यात- आमदार भास्कर जाधव

हेही वाचा : नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील-छगन भुजबळांचे समर्थक भिडले; शिवसृष्टी परिसरात तणावाचे वातावरण!

प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर महिलांनी हंडे आदळून पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी धारणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महिलांनी ठिय्या देत मनपा आयुक्तांनी प्रवेशद्वारावर यावे अशी मागणी केली. ते न आल्यास मनपा मुख्यालयात शिरण्याचा इशारा दातीर यांनी दिला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीलगतचा एक्सो पॉइंट ते खुटवडनगरपर्यंतच्या भागात पाणी पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. धरणे तुडुंब असतानाही शहरात जाणिवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला. पाण्याअभावी घरातील दैनंदिन कामे करणे अशक्य झाले आहे. अतिशय कमी दाबाने पाणी येते. त्यातून दैनंदिन गरजही भागत नसल्याची तक्रार महिलांनी केली. महिलांनी अकस्मात धडक दिल्याने मनपा मुख्यालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : कौटुंबिक वादातून पोलीस अधिकाऱ्याची मुलास मारहाण, गुन्हा दाखल

शिवसेना शिंदे-ठाकरे गट प्रथमच एकत्र

विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे सामान्यांतील रोष लक्षात घेऊन या आंदोलनात शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट पहिल्यांदा एकत्र आल्याचे पहायला मिळाले. शिवसेना दुभंगल्यापासून पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिकांमध्ये दोन गट पडले आहेत. उभयतांकडून परस्परांना लक्ष्य केले जात आहे. या परिस्थितीत शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेविका सुुवर्णा मटाले, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, युवा सेना जिल्हाध्यक्ष दीपक दातीर अशा दोन्ही गटांनी एकत्रित आंदोलन केले.

Story img Loader