नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या हिवाळी परीक्षा महाराष्ट्रातील २४५ केंद्रांवर सुरळीत सुरू झाल्या आहेत. या परीक्षा २८ जानेवारीपर्यंत आहेत. परीक्षेस एक लाख १४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. परीक्षा सुरळीत चालू ठेवण्यासाठी, तसेच परीक्षा कालावधीत होणारे कोणतेही गैरप्रकार टाळण्यासाठी विद्यापीठाच्या सर्व विभागीय केंद्रामार्फत केंद्रावर २९५ वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक, २४ भरारी पथके नेमण्यात आली आहेत, यामध्ये ७३ सदस्यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शिक : राष्ट्रीय युवा महोत्सवात महाएक्स्पो लक्षवेधक

परीक्षार्थींना प्रवेशपत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळच्या प्रवेशपत्रावर विद्यापीठाने ‘विकसित भारत ॲट २०४७’ ची लिंक दिली आहे. या लिंकवर गेल्यावर विद्यार्थ्यांनी विकसीत भारत २०४७ बाबत त्यांच्या मनातील कल्पना मांडायच्या आहेत. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीतपणे पार पडत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik yashwantrao chavan maharashtra open university exams started at 245 exam centers css