नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावे, शहरात वाहतूक पोलिसांना मदतीसाठी १८० सहायक नियुक्त करण्यात यावेत, या मागण्या महानगरपालिकेतील कार्यालयात वाहतूक व्यवस्थेविषयी आयोजित बैठकीत करण्यात आल्या.महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सुचनेनुसार पोलीस उपआयुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी तसेच महानगरपालिका अधिकारी प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल हे शहर परिसरातील वाहतूक समस्येविषयी आयोजित बैठकीस उपस्थित होते.

वाहतूक समस्या तसेच शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर चर्चा करण्यात आली. शहरात २७ ठिकाणी नवीन स्वयंचलित वाहतूक नियंत्रक (सिग्नल) यंत्रणा बसवण्यात यावी, ३० ठिकाणी अतिरिक्त वाहनतळांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. शहरातील ३४ गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यांवरील व दुकांनासमोरील अतिक्रमण हटवणे, वाहतूक बेटांचा आकार कमी करणे किंवा काढून टाकणे, सर्व्हिस रस्त्यावरील वेगवेगळ्या गॅरेज समोरील, भंगार दुकानांसमोरील वाहने पुढील सात दिवसात काढण्यात यावीत अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

also read

रोहिंगे, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका; मालेगावचे तहसीलदार,नायब तहसीलदार निलंबित

इंदिरानगर बोगदा ते आठवण हॉटेल या नवीन रस्त्यात वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब स्थलांतरीत करण्याची सूचना करण्यात आली.
शहरातील वाहतूकक सुधारणांविषयक काही उपाययोजना अगर सूचना असल्यास पोलीस आयुक्त कार्यालयाकडील व्हॉट्सअप क्रमांक ९९२३३२३३११ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

Story img Loader