नाशिक : सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होणार हे निश्चित मानले जात असून अजित पवार गटाचे आमदार माणिक कोकाटे यांना शह देण्यासाठी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली आहे. सांगळे यांच्या प्रवेशामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.

सिन्नरच्या उमेदवारीसाठी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह काहीजण इच्छुक होते. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधून सर्वाधिक म्हणजे सुमारे सव्वा लाखाचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही जागा सुरक्षित मानली जात होती. लोकसभा निवडणुकीत सांगळेंनी वाजेंना सहकार्य केले होते. त्याची परतफेड विधानसभेतून केली जात असल्याचे मानले जाते. जितेंद्र आव्हाड यांनी सांगळेंना शरद पवार गटाकडे आणण्यासाठी नियोजन केले.

Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
Sunil Tatkare Mahayuti
Sunil Tatkare : “सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर”, शिंदे गटाच्या आमदाराची घणाघाती टीका; महायुतीतील वाद चव्हाट्यावर!
rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”
MNS nominated former corporator Dinkar Patil from Nashik West after BJP's ticket distribution
भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार
Ghansawangi Assembly Constituenc
Ghansawangi Assembly Election 2024 : घनसावंगी विधानसभा मतदासंघ : राजेश टोपे वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी ठरणार?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा…पहिल्या दिवशी नाशिक पूर्व, मालेगाव बाह्यमधून दोन अर्ज दाखल

मंगळवारी मुंबईत शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार आदींच्या उपस्थितीत उदय सांगळेंचा पक्षात प्रवेश झाला. सिन्नरमधून तेच पक्षाचे उमेदवार राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या उमेदवारीतून शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी मतांची मोट बांधण्याचे नियोजन केले आहे. सिन्नरमध्ये मराठा आणि वंजारी मतदारांची संख्या मोठी आहे. खासदार वाजे हे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या मदतीने हे समीकरण जुळवून आणण्याची तयारी करण्यात आली आहे. आपल्याला विश्वासात घेऊन उदय सांगळे यांचा पक्षप्रवेश झाल्याचे कोंडाजीमामा यांनी सांगितले. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य असून कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा…छगन भुजबळ यांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज

गणेश गिते यांची प्रतिक्षा कायम

सिन्नर विधानसभेसाठी उदय सांगळे यांना प्रवेश देत उमेदवारी जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादीने (शरद पवार) नाशिक भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गिते यांना मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रतिक्षेत ठेवले. नाशिक पूर्वमधून ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. याआधी त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. महाविकास आघाडीतील शहरातील जागांचा तिढा सुटलेला नाही. नाशिक पूर्वची जागा पक्षाला मिळाली तरी भाजपमधून आलेल्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या वर्तुळातून होत आहे. त्यामुळे गिते यांचा प्रवेश होईल की नाही, याबद्दल काही पदाधिकारी साशंकता दर्शवितात.