जळगाव : बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे रविवारी शहरात दुचाकीस्वाराच्या गळ्याला जखम झाली, तर १० वर्षाच्या मुलाचे बोट कापले गेले. तसेच मेहरुण तलाव परिसरात पतंग महोत्सवात पाच जण किरकोळ जखमी झाले. अमळनेर येथे दुचाकीस्वाराचा ओठ, डोळे आणि पायाला मांजामुळे जखम झाली. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मांजा अडकलेल्या चार पक्ष्यांचे प्राण वाचविले.

शहरात अजिंठा चौकाकडून येत असलेले सचिन घुगे (३२) यांच्या गळ्याला सिंधी कॉलनी परिसरात तुटून आलेल्या पतंगाच्या मांजामुळे जखम झाली. हरिविठ्ठलनगर भागात १० वर्षाच्या मुलाचा उजवा बोट पतंग उडवीत असताना मांजामुळे कापला गेला. मेहरुण तलाव परिसरातील पतंगोत्सवात पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. अमळनेर येथे चंद्रशेखर भावसार (रा. पानखिडकी) या दुचाकीस्वाराच्या ओठ, डोळा आणि पायाला नायलाॅन मांजामुळे जखम झाली. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी गांधलीपुरा, इस्लामपुरा, बालाजीपुरा भागातील पतंगोत्सवात नायलॉन मांजाचे १५ रहाट जप्त केले.

हेही वाचा >>> धुळे: अहिराणी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग, खान्देशसह गुजरात, मध्यप्रदेशातील साहित्यिकांचाही सहभाग

वन्यजीव संस्थेने पक्ष्यांचे प्राण वाचविले

शहरात वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यात बहिणाबाई उद्यानाजवळ गायबगळा, कुसुंबा-चिंचोली रस्त्यावर चिमणी, कबुतर आदी पक्ष्यांचे प्राण वाचविले. योगेश गालफाडे, प्रदीप शेळके, राजेश सोनवणे यांनी शहरात विविध ठिकाणी जाऊन जखमी झालेल्या पक्ष्यांवर तातडीने उपचार केले. No भुसावळ, नशिराबाद पुलाजवळ जखमी अवस्थेत पक्षी अडकला असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विजय रायपुरे यांना मिळाली. रवी तायडे, अनिकेत तायडे, अक्षय धौसैले, वीरेंद्र तुरकेले यांना सोबत घेऊन नशिराबाद जवळ मांजात अडकलेल्या कोकिळ पक्ष्याचा जीव वाचवला.

Story img Loader