लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: त्र्यंबकेश्वर येथे संदल मिरवणुकीदरम्यान इतर धर्मियांकडून मंदिरात शिरण्याचा कथित प्रकार घडल्यानंतर गावातील सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली असताना या प्रकरणाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी वातावरण तापत ठेवण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जात आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकारण्यांकडून दिल्या जात आहेत. राजकारण्यांचे येणे-जाणे सुरुच असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकला भेट दिल्यानंतर मंगळवारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भेट देत स्थानिकांशी संवाद साधला.

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ
Canada Khalistani
Canada : कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराचा कार्यक्रम रद्द; खलिस्तानी धमकीमुळे हिंसाचाराची भीती
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!

त्र्यंबकेश्वर येथील कथित प्रकारानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने मंदिर शुध्दीकरणाचा विधी करण्यात आला. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने कारवाईची मागणी करण्यात आली. पुरोहित संघाच्या वतीनेही संशयितांवर कारवाईसाठी आग्रह धरण्यात आलेला असताना उपमुख्यंत्र्यांकडून एसआयटीकडून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीकडून चौकशी सुरू असून दोन्ही गटातील लोकांशी चर्चा करुन परंपरा, प्रथा समजून घेण्यात येत आहेत.

आणखी वाचा-जळगाव: अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा तरुणांचा प्रयत्न

दरम्यान, या प्रकरणावर राजकीय मंडळींकडून रोज वेगवेगळी विधाने येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत घडलेल्या प्रकारानंतर स्थानिकांनी शांतता ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्र्यंबकला धार्मिक सलोखा असून काही जण येथील शांतता बिघडविण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्र्यंबकेश्वर प्रकरणात इतरांनी लुडबूड करण्याचे काय कारण, असा प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ज्या त्र्यंबक राजामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह होतो. त्या देवाला श्रध्दापूर्वक धूप दाखविल्यास काय अडचण, असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, आ. नितेश राणे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत काही गैरसमज पसरविले जात असल्याने त्या पार्श्वभूमीवर भेट दिल्याचे सांगितले. राणे यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.

आणखी वाचा-खासगी व्यापाऱ्याकडे एकात्मिक बालविकासचा शिधा; ८३ हजाराचा ऐवज जप्त

हा लँड जिहादचा प्रकार- नितेश राणे यांचा आरोप

त्र्यंबकेश्वर येथे शांतता भंग करण्यासाठी आलेलो नाही. १३ मे रोजी घडलेल्या घटनेविषयी गैरसमज पसरविला जात असून हिंदुची बदनामी केली जात असल्याने भेट देण्यासाठी आलो. इतरांकडून वर्षानुवर्षाची परंपरा असल्याचे जे सांगण्यात येत आहे ते चुकीचे असल्याचे आ. नितेश राणे यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राणे यांनी १३ मे रोजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर येऊन फेसबुक प्रक्षेपण का केले, जिहादी विचारांचे युवक का येतात, असे प्रश्न उपस्थित केले. मंदिर बंद असतांना ते आले. मंदिरात जाण्याचा हट्ट केला. हिंदू धर्मानुसार मंदिरात येऊन दर्शन घेण्यास कोणाचाही आक्षेप नाही. महाविकास आघाडी सरकार असतांना ते चार पाऊल आतमध्ये आले आहेत. येथील प्रकार लॅंड जिहाद आहे, धार्मिकस्थळी मज्जिद बांधल्या जात आहेत. फेसबुकवर प्रक्षेपण करणाऱ्या मुलावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल असून एसआयटी चौकशीतून सर्व बाहेर येईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.