नाशिक – शहरात आयोजित ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी चार वाजता होणार आहे. त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.

पोलीस महासंचालक व आयोजक समितीच्यावतीने आयोजित स्पर्धेत राज्यभरातील पोलीस दलातील खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी सहभागी संघांचे संचलन होईल. सहा फेब्रुवारी रोजी या स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, खो-खो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, व्हॉलिबॉल आदी १७ क्रीडा प्रकारात सामने होत आहेत.

हेही वाचा – नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेचा पाच तालुक्यात संथपणा – मार्चअखेर कामे पूर्ण करण्याची तंबी

हेही वाचा – वाळूमाफियांचे वाहन जळगाव निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी अडवले, अन घडले भयंकर

व्हॉलीबॉल सामन्यात प्रशिक्षण संचालक (ट्रेनिंग डायरेक्टर) संघाने नागपूर शहर संघावर विजय मिळवला. महिलांच्या गटात नागपूर शहराने नागपूर परिक्षेत्राविरुद्ध विजय मिळवला. महिला गटातील अन्य सामन्यात प्रशिक्षण संचालक संघाने मुंबई शहरला तर पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूर परिक्षेत्र संघाने नागपूर परिक्षेत्र संघाला पराभूत केले. वेटलिफ्टिंगमध्ये महिला गटात अजिंक्यपद मुंबई शहरला मिळाले. द्वितीयस्थानी प्रशिक्षण संचलनालय, तृतीय क्रमांक कोल्हापूर परिक्षेत्राला मिळाला. उत्कृष्ठ खेळाडू म्हणून मुंबई शहरच्या सोनल बच्चे यांची निवड झाली. या स्पर्धेचा समारोप शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Story img Loader