लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्यात धरणांची पातळी लक्षणीयरित्या उंचावत असून अनेक भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७५ टक्के भरले आहे. जलसाठा ८५ टक्क्यांवर गेल्यानंतर त्यातून विसर्ग केला जाणार आहे. शनिवारी दुपारी पालखेड धरणातून २३४५ क्युसेकचा विसर्ग कादवा नदीपात्रात करण्यात आला. काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कडवा धरणातून ८२९८ आणि दारणातून १९९७२ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील विसर्गाचे प्रमाण आणखी वाढविले जाणार आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात जायकवाडीसाठी जिल्ह्यातून सुमारे पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
Shelter 2024 home exhibition, Houses Nashik city,
नाशिक शहरात १५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरे, आजपासून शेल्टर २०२४ गृह प्रदर्शन
Mumbai Nashik Highway Accident, Traffic jam Thane,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघात, ठाण्यात वाहनांच्या रांगा; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल
Maharashtra State Cabinet Expansion Satara district gets maximum ministerial posts
मराठ्यांना प्राधान्य… सातारा जिल्ह्यास सर्वाधिक मंत्रिपदे… मुंबई, नाशिकची बोळवण… मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची किनार?
wheat
गहू आणि खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार? कारण काय? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

नाशिक, इगतपुरी त्र्यंबकेश्वर, दिंडोरीसह अनेक भागात रात्रीपासून संततधार सुरु आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. शहरात रात्रीपासून सायंकाळपर्यंत ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. दिंडोरी तालुक्यात दमदार पावसामुळे पालखेड धरणात दुपारी ४६७ दशलक्ष घनफूट म्हणजे ७१ टक्के जलसाठा झाला. पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धामण, कोलवण नद्यांसह परिसरातील नाले दुथडी भरून वहात आहेत. पालखेडमधून दुपारी सुरू झालेला विसर्ग सायंकाळी २३४५ क्युसेकपर्यंत वाढविला गेला. दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणातील विसर्ग सायंकाळी सुमारे २० हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला. कडवा धरणातून ८२९८ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये २८ हजार ७४८ दशलक्ष घनफूट म्हणजे ४४ टक्के जलसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी आहे.

आणखी वाचा-नाशिकमध्ये मविआमध्ये बेबनाव, ठाकरे गटावर शरद पवार गटाची टीका

जायकवाडीसाठी पाच टीएमसी पाणी

तीन धरणांमधून सोडले जाणारे पाणी नंतर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात येते. या बंधाऱ्यातून पुढे ते मराठवाड्यातील जायकवाडीसाठी जाते. विसर्ग वाढत असल्याने नांदूरमध्यमेश्वरमधील विसर्ग दुपारी चारपर्यंत १८ हजार ९३० क्युसेकपर्यंत वाढविला गेला असून रात्री त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. एक जून ते तीन ऑगस्ट या कालावधीत नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीसाठी ४७२२ दशलक्ष घनफूट (सुमारे पाच टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. प्रारंभीचे दीड ते पावणेदोन महिने नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. पावसाचा जोर वाढत असल्याने पुढील काळात गंगापूरसह अन्य धरणांमधील विसर्गाला सुरूवात होईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-रात्रीतून सहा बंदुका, चार तलवारी, चॉपर, गुंगीचे औषधे असा साठा कुठे सापडला?

गंगापूरमधूनही लवकरच विसर्ग

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूरच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. धरण परिचालन सूचीनुसार ८५ टक्के जलसाठा झाल्यानंतर गंगापूरमधून विसर्ग केला जाणार आहे शनिवारी सायंकाळपर्यंत गंगापूरमध्ये ७३ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरणातून पाणी सोडावे लागणार आहे.

Story img Loader