नशिक – इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसरी यादी प्रसिद्ध झाली. पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांमध्ये टक्केवारी कमालीची वाढली. पहिल्या यादीनंतर टक्केवारी खाली येईल, असे अपेक्षित असताना वाणिज्य तसेच विज्ञान शाखेसाठी जाहीर झालेली यादी पाहता पालकांसह विद्यार्थी आश्चर्यचकित झाले.
दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर २१ जून रोजी अकरावी प्रवेशाची पहिली यादी महापालिका हद्दीतील महाविद्यालयांसाठी जाहीर झाली. शहरातील ६४ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया आभासी पद्धतीने सुरू आहे. पहिल्या यादीत आवडते महाविद्यालय न मिळाल्याने काहींनी प्रवेश निश्चित केले नाही. याचा परिणाम दुसऱ्या यादीवर झाला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्वावर अनेक महाविद्यालयांनी पहिल्या यादीच्या तुलनेत प्रवेशाची टक्केवारी वाढविली आहे.
हेही वाचा – नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची अधिक अडचण
सद्यस्थितीत दुसऱ्या यादीत नाशिकमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यसाठी १५,२८७ जागा उपलब्ध असून त्यासाठी आठ हजार ८२८ अर्ज आले. दुसऱ्या यादीत चार हजार ८९० जागा उपलब्ध आहेत. वाणिज्य, विज्ञानसाठी पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीसाठी टक्केवारी वाढली आहे. यामध्ये हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयात कलासाठी ४१३, विज्ञान ३९९, सर डॉ. मो. स. गोसावी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वाणिज्यसाठी ३७६, विज्ञानसाठी ३९१, बॉईज टाऊन कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्यसाठी ३६९, विज्ञान ३८७, के.टी.एच.एम. महाविद्यालयात कलासाठी ३५२, वाणिज्य ३१९ आणि विज्ञानसाठी ३६१, व्ही.एन. नाईक महाविद्यालयात कलासाठी ३२३, वाणिज्य २९५ आणि विज्ञानसाठी ३७६, पंचवटीतील लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयात कलासाठी ३१५, वाणिज्य ३३७ आणि विज्ञान २७६ गुणांची आवश्यकता आहे. सिडको महाविद्यालयात कलासाठी ३१४, वाणिज्य ३६१ आणि विज्ञानसाठी ३६९ गुण प्रवेशासाठी अपेक्षित आहे.