नाशिक – मालेगाव शहरासह तालुक्यातील अमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी आता स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. दुसरीकडे, नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गुटखा विरोधी अभियान चालूच राहणार असून अवैध प्रवासी वाहतूकविरूध्द कारवाई करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची आठ पथके कार्यरत आहेत. तसेच दुर्गम भागातील हातभट्टी व्यवसायांचे निर्मूलन करण्यासाठी महिला पोलिसांची तीन पथके देखील कार्यान्वित करण्यात आली आहेत. मागील महिन्यापासून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायाविरूध्दची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मागील महिन्यात वेगवेगळ्या ७४६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सव्वाचार कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. आता अवैध व्यवसायांसह अवैध वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगांव येथील अवैध व्यवसाय विशेषत: अमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी पोलीस उपनिरीक्षक अनिल पठारे यांच्या अधिपत्याखाली एका स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात होणारे रस्ते अपघात, निरपराध नागरिकांचे मृत्यू रोखण्यासाठी बेदरकारपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांविरूध्द पोलिसांनी कारवाई सुरू केली असून कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.