नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड येथील पेढे विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली. पुढील आठवड्यापासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. नवरात्रोत्सवात सप्तश्रृंग गडावर मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांनी प्रसाद म्हणून पेढ्यांची खरेदी केली जाते. भाविकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पेढे विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात आई भगवती पेढा सेंटर, भगवती पेढा सेंटर, आईसाहेब पेढा सेंटर, पेढा विक्री केंद्र, आराध्य पेढा सेंटर, भगवती प्रसाद पेढा सेंटर, जय माँ सप्तश्रृंगी पेढा सेंटर, मयुरी प्रसाद पेढा सेंटर यांची तपासणी करण्यात आली. याठिकाणी दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवल्याचे आढळले. त्यावर कुठल्याही प्रकारची टिकण्याची अंतिम तारीख टाकलेली नसल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of pedha sellers at saptashringa fort nashik ysh
Show comments