येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित, वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. औषधे बाहेरून घ्यावी लागणे, दुपारी चारनंतर आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचारी गायब होत असल्याने कुलूपबंद दरवाजा पाहत रुग्णांनी दुसऱ्या रुग्णालयात जाणे, या ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी केंद्राला भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत कामात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा दिला.

हेही वाचा- नाशिक : इगतपुरी तालुक्यात २४ तासांत तीन अपघात; तिघांचा मृत्यू तर, १४ जण जखमी

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
governor c p radhakrishnan warns poor water quality in rivers like godavari threatens human life
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
khadakwasla water, khadakwasla ,
‘खडकवासल्या’तील पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश

राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास मित्तल यांनी बुधवारी अचानक भेट दिली. केंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेबाबत कसून चौकशी केली. अनेक कर्मचारी आणि डॉक्टरांची अनुपस्थिती असल्याने त्यांनी हजेरीपट तपासला. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबाबत प्रश्नावली केली. रुग्णांशी संपर्क साधून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेबाबत विचारणा केली. आरोग्य केंद्राची इमारत पावसाळ्यात गळते. शस्त्रक्रिया, प्रसुती कक्ष असतानाही त्यात सुविधा नाहीत. केंद्रात पाण्याची व्यवस्था नाही, एक वर्षापासून केंद्रात एकही प्रसुती झालेली नसल्याचे ऐकून मित्तल संतप्त झाल्या. केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून एक राठोड नावाचे अधिकारी रजेवर असल्याने डॉ. कुंटे यांच्यावर संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी आहे. हे दोन्ही अधिकारी रात्री केंद्रात राहत नाहीत. दुपारी चारनंतर एकही कर्मचारी केंद्रात राहत नसल्याने रात्रीच्या वेळेला परिचारिकाही नाही, अशा अनेक समस्यांचा पाढा रुग्णांनी वाचला.

हेही वाचा- जिल्हा बँकेची कर्जवसुली अमानुष पध्दतीची; भाजप किसान मोर्चाची तक्रार

आपण वैद्यकीय सेवा देण्यास असमर्थ आहात काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दौऱ्यादरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हेही उपस्थित होते. आठ दिवसात कारभारात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा मित्तल यांनी दिला.

Story img Loader