लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शहरात अंमली पदार्थांची विक्री तसेच सेवन करणारे अभिलेखावरील आरोपींच्या तपासणी मोहिमेत ३६ जण मिळून आले तर ४५ जण शोध घेतलेल्या पत्त्यावर मिळून आले नाहीत. ११ जण कारागृहात आहेत.
शहरात अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपींची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने २१ अधिकारी आणि ९८ अंमलदार यांची पथके तयार करण्यात आली. संपूर्ण शहरातील एकूण ९६ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यात ३६ आरोपी त्यांच्या पत्त्यावर आढळले.
हेही वाचा… नाशिक: खंडणी प्रकरणी पत्रकाराला अटक
४५ आरोपी हे शोध घेतलेल्या पत्त्यावर आढळले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ११ आरोपी सध्या कारागृहात आहेत. चार आरोपी मयत असल्याची माहिती मिळाली.