जळगाव : जलजीवन योजनेत देशपातळीवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्याने ६३.६१ टक्के गुण प्राप्त करीत राज्यात प्रथम स्थानावर झेप घेतली आहे, तर देशात ६१ वे स्थान मिळविले आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार ४९२ गावांमधील सहा लाख ८० घरांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर नल’ हे जल संकल्पनेतून साकार झालेल्या जलजीवन योजनेने जिल्ह्यात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत एकूण २६ योजना राबविल्या जात असून, त्यासाठी ५२६ कोटी ५६ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेतर्फे एक हजार ४०० योजना राबविल्या जात असून, एक हजार २३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. जलजीवन मिशन सर्वेक्षण-२०२३ मध्ये गुणांकन देताना भौतिक प्रगती; ज्यामध्ये घरांना नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा, पाणी गुणवत्ता तपासणी, तसेच पाणीपुरवठा स्त्रोतांची एफटीके कीटद्वारे होणारी तपासणी, प्रयोगशाळांत होणारी पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी यासाठी गुण दिले जातात.

हेही वाचा : येवला तालुक्यात दुकानातून एक कोटीची लूट; एक संशयित ताब्यात, दोन जण फरार

संस्थात्मक रचनेत पूर्ण होणार्या योजना गावांना हस्तांतरित करणे, तसेच कौशल्य प्रशिक्षण या बाबींच्या आधारेही गुणांकन होत असते. याअंतर्गत २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत नवीन निकषानुसार पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेतून अगदी वाडी-वस्त्या आणि दुर्गम भागापर्यंत शुद्ध पेयजल पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.